स्वयंसेवा


प्रत्येकाच्या मनात कुठेतरी स्वयंप्रेरणेची ठिणगी असते. चाकोरीबाहेर जाण्याची, काहीतरी वेगळे करून दाखवण्याची अदम्य धडपड सुरु असते. पण, साचेबद्ध जीवन, अर्थहीन प्रवास, अस्तित्व असून चेहरा नसल्यासारखा, या चक्रात आजची पिढी अडकलेली आहे. युवापिढीला सामाजिक वास्तवाची, आजूबाजूच्या परिस्थितीची ओळख झाली तर एक अर्थपूर्ण आयुष्य जगता येऊ शकतं, जगण्याला एक दिशा आणि हेतू प्रदान करता येऊ शकतो. समाजासाठी काहीतरी करायचं आहे, पण नेमकं काय आणि कसं करायचं? असा प्रश्न पडलेल्यांसाठी – समस्या डोळसपणे अभ्यासून त्यावर तोडगा काढण्यास इच्छुक असणाऱ्या सर्वांसाठी ‘आनंदवन समाजभान अभियान’ स्वयंसेवेची कवाडं खुली करत आहे.

संपर्क

आनंदवन क्षेत्रीय कार्यालय (आनंदवन समाजभान अभियान)

मधू-मालती, पहिला मजला, ४१/सी, फाटकबाग सोसायटी, नवी पेठ, पुणे – ४११ ०३०

दूरध्वनी: ०२०-२४५३०००६

ई-मेल: samajbhanabhiyan@gmail.com